Home / News / पुणे ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचे नवे वेळापत्रक

पुणे ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचे नवे वेळापत्रक

पुणे – मुसळधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या मैदानी चाचणीचे...

By: E-Paper Navakal

पुणे – मुसळधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही चाचणी २९ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान होणार आहे.पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मैदानी चाचणी ९ ते २७ जुलै या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, पावसामुळे मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानूसार उमेदवारांनी पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन द्यावे, मैदानी चाचणीसाठी नव्या तारखेस सकाळी पाच वाजता हजर रहावे,असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts