पृथ्वीराज चव्हाणांनी मनोज जरांगेंची भेट घेतली

जालना- काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. ही भेट आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत आगामी विधानसभा निवडणूक व मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. काही दिवासंपूर्वी मनोज जरांगेपाटील यांनी आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. या संदर्भातल्या घोषणेपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे-पाटील यांची राजकीय भेट झाल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.