मुंबई – मुंबईतील प्रसिध्द पोटविकार शल्यचिकित्सक डॉ.विनायक नागेश श्रीखंडे यांचे काल सकाळी दादर हिंदू कॉलनीमधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैद्यकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.डॉ श्रीखंडे अनेक वर्षे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणि हिंदू कॉलनी येथील त्यांच्या नर्सिंग होममध्ये रुग्णांना सेवा देत होते.ग्रँट मेडिकल महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले.त्यांच्या पक्षात मुलगा डॉ. शैलेश, मुली डॉ अंजना, सीमा, वासंती आणि डॉ. आनंद नांदे आणि धनंजय खोत असा परिवार आहे.डॉ. श्रीखंडे हे इंटरनॅशनल हिपेटो पॅनक्रियाटो बिलरी असोसिएशन या संस्थेच्या भारतातील शाखेचे पहिले अध्यक्ष होते.१९९४ साली त्यांनी देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती.
