प्रियंका गांधी यांचा रोड शो दरम्यान काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने

नागपूर – नागपूर मध्य शहरात बडकस चौक प्रियंका गांधी यांचा रोड शो सुरू असताना काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्ये आमनेसामने आल्याची घटना घडली. कॉंग्रेसचा प्रचार हिंदू विरोधी आहे असा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला. दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे गोंधळ कमी झाला. परंतु परिसरात वातावरण तणावपूर्ण पसरले होते. पोलिसांनी लाठीमार केला नाही. परंतु दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळे करण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके या दोन उमेदवारांसाठी दोन्ही मतदारसंघांमध्ये आज कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो पार पडला.