नवी दिल्ली – भारतातील उद्योजक व व्यावसायिकांची शिर्षसंस्था असलेल्या फिक्कीच्या अध्यक्षपदी इमामी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.हर्षवर्धन अग्रवाल हे सध्या फिक्कीचे उपाध्यक्ष असून येत्या २१ नोव्हेंबर रोजी ते फिक्कीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारतील. सध्या फिक्कीच्या अध्यक्षपदी महिंद्रा एँड महिंद्राचे मुख्याधिकारी अनिश शाह आहेत. अग्रवाल हे ३.१ अब्ज डॉलरच्या इमामी समुहाचे दुसऱ्या पिढीतील उद्योगपती आहेत.
