बंगळुरू
देशातील आयटीचे केंद्र असलेल्या बंगळुरूशहरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिक पाण्यासाठी टँकर आणि नळांवर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. बंगुरुळूला पाणीपुरवठा करणार्या तलावांतील पाणीपातळी तळाला गेल्यामुळे बंगळुरूसह आजूबाजूच्या परिसरात पाणीपुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली आहे. पाण्याच्या टँकरसाठी नागरिकांना दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्नाटकातील 200 हून अधिक तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून शहरांच्या जलाशयांमधील पाण्याची पातळी कमी होत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच ही परिस्थिती असेल, तर ऐन उन्हाळ्यात किती भीषण पाणीटंचाई होईल, असा प्रश्न बंगळुरूकर विचारत आहेत.