फेसबुक व इन्स्टाग्राम पुन्हा एकदा डाऊन

नवी दिल्ली
प्रसिद्ध सोशल मीडिया ॲप्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम आज पुन्हा एकदा डाऊन झाले. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रवेश करताना वापरकर्त्यांना समस्या आल्या. फोटो अपलोड करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्याचे वापरकर्त्यांच्या तक्रारीतून स्पष्ट झाले आहेत.
अद्याप मेटाकडून कोणतेही अधिकृत खुलासा केला नाही. ही समस्या किती वेळ लागेल याची अनधिकृत माहिती उघड झाली नाही. २६ टक्के वापरकर्त्यांना इंस्टाग्रामच्या वेब आवृतीत प्रवेश करता आलेला नाही. यापूर्वी 5 मार्चच्या रात्री मेटा कंपनीच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांना लॉगिन आणि फीड रीफ्रेश करण्यात अडचणी येत होत्या. फेसबूकवर, वापरकर्त्यांची खाती आपोआप लॉग आउट झाली, तर इन्स्टाग्रामवर, वापरकर्ते नवीन फीड्स रिफ्रेश करू शकले नाहीत. 4 ऑक्टोबर 2021 रोजी जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्म जवळपास 6 तासांसाठी बंद करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top