फ्लोरिडात इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाची वाहनाला धडक! २ ठार

फ्लोरिडा- अमेरिकेतील फ्लोरिडातील कॉलियर काउंटीमधील पाइन रिज रोडजवळ एका महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करताना एक छोटे खासगी विमान वाहनाला धडकल्यानंतर स्फोट झाला. हा महामार्ग फोर्ट लॉडरडेलकडे जातो. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. यामुळे परिसरात काळ्या धुराचे लोट हवेत पसरले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या स्फोटाचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला. याबबात विमानतळाचे प्रवक्ते रॉबिन किंग यांनी एक निवेदन जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, विमानाने कोलंबस, ओहायो येथील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या विमानतळावरून दुपारी १ वाजता उड्डाण केले होते. ते नेपल्समध्ये उतरणार होते. नेपल्स म्युनिसिपल विमानतळावर विमान उतरण्याच्या दोन मिनिटे आधी, वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधत दोन्ही इंजिन निकामी झाल्याचे सांगितले आणि आपत्कालीन लँडिंगची विनंती केली. मात्र, आपत्कालीन लँडिंगदरम्यान विमान एका वाहनाला धडकल्याने स्फोट झाला. या खासगी विमानात ५ प्रवासी होते. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या अपघातातील ३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top