बँकांमधील कर्जाचे नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार

मुंबई- १ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँके (आरबीआय)कडून कर्जाचे नियम बदलले जाणार आहेत. आरबीआयने सर्व बँका आणि सर्व नॉन-बॅंकिंग वित्त संस्थांना यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये त्यांना नवीन नियमांनुसारच कर्ज द्यावे लागेल. तसेच कर्ज देताना ते ग्राहकांपासून कोणत्याही अटी लपवू शकणार नाहीत. तसेच या बँकांना व्याजासह, ग्राहकांना इतर छुप्या खर्चाची माहितीदेखील द्यावी लागणार आहे.

ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने आरबीआय आता कर्ज नियमात बदल करणार आहे.त्यामुळे पारदर्शकताही वाढेल.यानुसार आता बँकांना ग्राहकांना सर्व छुप्या अटींची माहिती आधीच द्यावी लागणार आहे.अनेक बँका ग्राहकांना कर्ज देताना शब्दांच्या जाळ्यात अडकवून लुबाडतात.याबाबत आलेल्या तक्रारींमुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.मात्र केवळ किरकोळ आणि सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगासाठी दिलेल्या कर्जासाठी कर्जाचे नियम बदलतणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top