मुंबई
बंगालच्या उपसागरातील २३ ते २७ मे दरम्यान चक्रीवादळ घोंघावणार असून या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशासह महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांवर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चक्रीवादळाचा मार्ग अद्याप स्पष्ट झाला नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच उद्या परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.