Home / News / ‘बटोगे तो कटोगे’घोषणालग्न पत्रिकेवर छापली

‘बटोगे तो कटोगे’घोषणालग्न पत्रिकेवर छापली

गांधीनगर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटोगे तो कटोगे’ ही घोषणा सध्या देशभरात चर्चेत आहे. ती गुजरातमधील...

By: E-Paper Navakal

गांधीनगर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटोगे तो कटोगे’ ही घोषणा सध्या देशभरात चर्चेत आहे. ती गुजरातमधील एका व्यक्तिने आपल्या भावाच्या लग्नपत्रिकेवर छापली आहे. ही लग्नपत्रिका समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

गुजरातमधील भावनगरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याने भावाच्या लग्नाच्या पत्रिकेवर हा ‘बटोगे तो कटोगे’ नारा छापला आहे. त्यासोबत पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ व राम मंदिराचा फोटोदेखील छापला आहे. २३ नोव्हेंबरला हा विवाह सोहळा पार पडणार आहे. ही लग्नपत्रिका सध्या चर्चेत आहे. या संदर्भात भाजपा कार्यकर्त्याने सांगितले की, लोकांना जागरूक करण्यासाठी व पंतप्रधान मोदींचा संदेश पसरण्यासाठी आम्ही लग्नपत्रिकेवर ही घोषणा छापली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts