बरेलीत छेडछाडीला विरोध केल्याने अल्पवयीन मुलीला ट्रेनसमोर फेकले

बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली शहरातील सीबी गंज भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.दोन तरुणांनी छेडछाड केल्याने त्यास विरोध केल्यामुळे एका १७ वर्षांच्या विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनसमोर फेकले. यात या मुलीला आपले हात आणि पाय गमवावे लागले आहेत.पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या वडिलांना अटक केली आहे.तर त्याचा दुसरा साथीदार पसार झाला आहे.
ही पीडित मुलगी शिकवणी क्लासमधून घरी परतत असताना दोघा नराधमांनी तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर त्यांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यास त्या मुलीने प्रतिकार केला.त्यामुळे संतापलेल्या दोघांनी त्या मुलीला थेट धावत्या ट्रेनसमोर फेकले. या घटनेनंतर ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत रेल्वे क्रॉसिंग जवळी पडलेली आढळून आली.यात तिचे हात आणि पाय कापले गेले आहेत. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.याप्रकरणी निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.तर दोघांना अटक केली आहे. हा तरुण आधीपासून या मुलीला छेडत होता. तशी तक्रार त्याच्या कुटुंबाने मुलीच्या वडिलांनी केली होती. दरम्यान,या जखमी विद्यार्थीनीच्या उपचाराचा खर्च जिल्हा प्रशासन उचलणार आहे.तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगींच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top