वाई- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या बलकवडी धरणात सध्या २२ टक्के मृत पाणीसाठा शिल्लक आहे. धरण कोरडे पडू लागल्याने धरणाच्या पोटातील जुन्या खुणा दिसत आहेत.
बलकवडी धरण हे ४ टीएमसी पाणी क्षमतेचे आहेत.वाई,खंडाळा आणि फलटण तालुक्यासाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे. हे धरण अतिवृष्टीच्या भागात येत असले तरी गेल्यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. तसेच फलटण तालुक्याला प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने हे धरण पूर्ण रिकामे झाले आहे. बलकवडी पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे धरणाची ही परिस्थिती झाल्याचाही आरोप स्थानिक नागरिक करत आहे.