बांद्याच्या गणेश नगरात माघी गणेश जयंती उत्सव

सावंतवाडी- सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील “श्री गणेश मंदीर” वाफोली रोड बांदा येथे उद्या माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमीत्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यादिवशी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, अभिषेक पूजा होईल. त्यानंतर भाविकांना दर्शन दिले जाईल.त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री सत्य विनायक महापुजा आणि दुपारी १२ वा गणेश जन्म सोहळा होईल. दुपारी १ ते ३ महाप्रसाद तर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ९ वा अष्टविनायक पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ निरवडे यांचा ” हा खेळ संचिताचा ” हा पौराणिक नाट्य प्रयोग सादर होणार आहे.तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणेश मंदीर सेवा समिती, बांदाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top