पिंपरी- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा-एकच्या परवानगीसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समित्यांच्या परिषदेत सांगताच पणन मंत्री अब्दुल सत्तार संतापले. वाद निर्माण होईल, असे वक्तव्य करु नका, असे म्हणत त्यांनी माइकचा ताबा घेतला. उपस्थित सभापतींनी पदाधिकाऱ्यांना बोलू देण्याची विनंती करताच मंत्री सत्तार यांनी मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे, असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. अब्दुल सत्तार यांचे करायचे काय. खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणांनी आज निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह दणाणून सोडले.
