मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्ताने ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, रश्मीताई ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आज शिवतीर्थ येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन मानवंदना दिली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारीही हजर होते.
