बिहारमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

  • २ जण जखमी

पाटणा

बिहारच्या गया जिह्यातील बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगदाहा गावात आज भारतीय लष्कराचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाड कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील महिला लष्करी अधिकारी आणि वैमानिक जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर लष्करी अधिकारी आणि वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

प्रशिक्षण सुरु असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हे हेलिकॉप्टर ४०० फूट उंचीवरून जमिनीवर कोसळले. या हेलिकॉप्टरला मायक्रोलाइट एअरक्राफ्ट असेही म्हणतात. हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळताच मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. त्यानंतर स्थानिकांनी महिला लष्करी अधिकारी आणि वैमानिकाला हेलिकॉप्टरमधून सुखरुप बाहेर काढले.अपघाताची माहिती मिळताच ऑफिसर ट्रेनिंग अकादमीचे अधिकारी पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर महिला लष्करी अधिकारी आणि वैमानिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top