बीडमध्ये अपक्ष उमेदवारचा मतदान केंद्रातच मृत्यू

बीड- बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बाळासाहेब शिंदे मतदान सुरू झाल्यावर बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यावेळी ते चक्कर येऊन खाली पडले. त्यांना बीड शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.