बीडमध्ये मराठा समाजाकडून प्रीतम मुंडेंचा ताफा अडवला

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील सावरगांव येथे भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या गाडीचा ताफा मरठा समाजाकडून अडवण्यात आला. मराठा तरुणांनी त्यांचा ताफा अडवल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करा, नाहीतर तुम्हाला बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही मराठा तरुणांनी दिला आहे. यावेळी आंदोलक तरुणांनी घोषणाबाजीही केली. यावरून आता मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आता मराठा आरक्षणाच्या मागणीवरून लोकप्रतिनिधींना जाब विचारायला सुरुवात केली आहे. भाजपा खासदार प्रीतम मुंडे या दिव्यांगाच्या कार्यक्रमासाठी माजलगावमध्ये आल्या होत्या. यावेळी माजलगावहून परतत असताना त्यांचा ताफा अडवून मराठा तरुणांनी घोषणाबाजी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top