बॉब्स रेडचे बॉब मूर यांनी मृत्यूपूर्वीच कर्मचाऱ्यांकडे कंपनीची मालकी सोपवली

न्यूयॉर्क
बॉब्स रेड मिलचे संस्थापक बॉब मूर यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले होते. जगाचा निरोप घेण्यापूर्वी बॉब मीर यांनी आपल्या कंपनीची मालकी 700 हून अधिक कर्मचाऱ्यांकडे सोपवली होती. आपल्या कर्मचाऱ्यांवर त्यांचे किती प्रेम होते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले आहे.
2010 मध्ये मूर यांनी फक्त कर्मचाऱ्यांसाठी शेअरची योजना जाहीर केली होती. त्यावेळी कंपनीत 209 कर्मचारी होते. 81 व्या वाढदिवशी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपनीची चांगली वाढ झाली. कंपनीत सध्या 700 कर्मचारी आहेत. मूर यांच्या मृत्यूपूर्वीच संपूर्ण कंपनी कर्मचाऱ्यांच्या नावावर झाली होती. त्यांनी पारंपरिक बिझनेस मॉडेल डावलून कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले होते. त्यांचे म्हणणे होते की, कंपनीला झालेला लाभ केवळ मालकालाच का मिळावा? लाभ हा कर्मचाऱ्यांनादेखील मिळत राहावा. मी सत्तर वर्षांपूर्वीच शिकलो होतो की, कठोर मेहनत आणि दयाळूपणा हा यशाचा मंत्र आहे. माझा छोटा व्यवसाय वाढत गेला. त्यामुळे त्यांची परतफेड करण्याची मला संधी होती. बायबलमधील एक वचन माझे आवडते आहे. तुम्हाला लोकांकडून जी अपेक्षा आहे, तेच तुम्ही लोकांसाठी करायला सुरू करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top