Home / News / भंडारा जिल्ह्यात विजेच्या झटक्याने महिलेचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात विजेच्या झटक्याने महिलेचा मृत्यू

भंडारा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे विजेच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाला. आशा भास्कर चौधरी (४६) असे मृत महिलेचे नाव...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भंडारा

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे विजेच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाला. आशा भास्कर चौधरी (४६) असे मृत महिलेचे नाव आहे. आशा काल सकाळी स्वयंपाकासाठी कुलरच्या खाली ठेवलेल्या टोपलीतून भाजी काढण्याकरिता गेल्या होत्या. यावेळी चालू कुलरच्या पाण्याच्या टाकीला त्यांचा हात लागल्याने त्यांना विजेचा झटका बसला.
झटका लागताच त्या ओरडल्या. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आशा यांचे पती धावत आले. तेव्हा त्या कुलरच्या पाण्याच्या टाकीला चिकटलेल्या दिसल्या. त्यामुळे त्यांनी कुलरचे बटण बंद करून आशा यांना कुलरपासून दूर केले व जमिनीवर झोपवले. तत्काळ गावातील डॉक्टरांना बोलावले. मात्र, तोपर्यंत त्या मरण पावल्या. लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. या दुर्घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदर विलास मातेरे करीत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या