भारताची सौरमोहीम अंतिम टप्प्यात ‘आदित्य’कडून सौर वाऱ्यांचे निरीक्षण

बंगळुरू- भारताची पहिली सौर मोहीम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. आदित्य यान हे लवकरच एल-१ पॉईंटवर पोहोचणार असून आता या यानाने सौरवार्‍यांचे निरीक्षण करून टिपणे घेण्यास सुरुवात केली आहे,अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. आदित्य एल -१ हे यान अगदी सुस्थितीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘आदित्य एल-१’ ही भारताची पहिली सौर मोहीम आहे.सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य हे यान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एल-१ या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. या ठिकाणाहून आदित्य यान २४x७ सूर्याचा अभ्यास करू शकणार आहे. २ सप्टेंबर रोजी आदित्य यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. यानंतर काही दिवसांनी आदित्यने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून एल-१ पॉईंटकडे प्रवास सुरू केला होता. २९ ऑक्टोबर रोजी आदित्य यानावर असणाऱ्या हाय एनर्जी एल-१ ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्टोमीटरने सोलार फ्लेअर डिटेक्ट करुन त्यांचे रेकॉर्डिंग केले होते. सर्व क्रियाकल्प पार पाडून आदित्य यान हे सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून
पुढील महिन्यात ७ जानेवारी २०२४ रोजी एल-१ पॉइंटवर पोहोचू शकते,असे सोमनाथ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top