भारतावर हमाससारखा हल्ला करू! दहशतवादी पन्नूची सरकारला धमकी

अमृतसर : भारतावर हमाससारखा हल्ला करू, अशी धमकी शीख फॉर जस्टिस दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारत सरकार आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिली आहे. गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात त्याने भारत सरकारला हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धातून धडा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
खलिस्तानी दहशतवादी पन्नूने सोशल मीडियावर शेअर केलेला हा विडिओ ४० सेकंदांचा आहे. त्यामध्ये त्‍याने म्‍हटले आहे की, भारताने इस्रायलमधील हमास हल्ल्यापासून धडा घ्यावा. आम्ही पंजाबला भारताचा भाग मानत नाही. भारताने पंजाबवर ताबा मिळवला आहे. तो स्वतंत्र करु. भारताने पंजाबमध्ये अतिक्रमण सुरूच ठेवले तर नक्कीच याचे पडसाद उमटतील. पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर हल्ले होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यापासून धडा घेण्याची गरज आहे. भारतावरही असे हल्ले करू, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार जबाबदार असेल. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना होत आहे. हा सामना उधळून लावण्याची धमकीही यापूर्वी पन्नूने दिली हाेती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top