लंडन
लेखिका आणि ब्रिटिश शैक्षणिक व लेखिका निताशा कौल यांनी त्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती त्यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे. कर्नाटक सरकारच्या आमंत्रणानंतरही त्यांना भारतात प्रवेश न देता बंगळूरू विमानतळावरुन परत पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
इंग्लडमधील शिक्षण तज्ञ व लेखिका निताशा कौल यांना कर्नाटक सरकारने संविधान व राष्ट्रीय एकता या विषयावर आयोजित एका अधिवेशनात बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. त्याप्रमाणे या भारतीय वंशाच्या प्राध्यापिका निताशा कौल बंगळूरूला पोहोचल्या. मात्र विमानतळावरच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कौल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिकेचा संदर्भ देऊन त्यांना भारतात प्रवेश नाकारला. मला लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांवर बोलायला प्रवेश नाकारण्यात आल्याचे या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेने आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे. कर्नाटक सरकारने प्रतिष्ठित व्याख्यात्या म्हणून त्यांना बोलावले होते. माझ्याकडील सर्व कागदपत्रे वैध होती. माझ्याकडे युकेचा पासपोर्ट आणि ओसीआय हे कार्डही होते. असे असतानाही मला प्रवेश नाकारण्यात आला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.