नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात खनिजांमध्ये अत्यावश्यक सहकार्य वाढवण्यासाठी करारावर चर्चा होणार असून वाणिज्य परिषदेच्या भेटीदरम्यान हा मुद्दा मांडण्यात येणार आहे. केंद्रीय उद्योग मंत्री पियूष गोयल अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्या निमंत्रणावरून ३ ऑक्टोबरला वॉशिंग्टनला भेट देणार आहेत.
वाणिज्य मंत्रालयाने काल एका निवेदनात म्हटले की, गोयल आणि रायमोंडो भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी विस्तृत आणि वैविध्यपूर्ण करण्याच्या बाबतीतदेखील चर्चा करतील. दोन्ही देश एका सामंजस्य करारासाठी वाटाघाटी करत आहेत. यातून द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याचा हेतू आहे. गोयल हे अमेरिकी व्यापार प्रतिनिधी राजदूत कॅथरीन यांचीदेखील भेट घेतील.