भारत आणि इटलीमध्ये संरक्षण संबंध वाढीचा करार

नवी दिल्ली – भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इटलीचे संरक्षण मंत्री गिडो क्रोसेटो यांच्यात रोममध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेची बैठक पार पडली.या बैठकीत दोन्ही देशांच्या संरक्षण संबंध वाढीसाठी विविध करार करण्यात आले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे इटली आणि फ्रान्सच्या दौर्‍यावर असून त्यांनी दौऱ्याच्या पहिल्या फ्रान्समध्ये द्विपक्षीय चर्चा केली.यामध्ये दोन्ही देशांतील लष्करी प्रशिक्षण माहितीचे आदानप्रदान, सागरी युद्ध सराव आणि सागरी सुरक्षा आदी विषयांचा समावेश होता. भारतातील स्टार्ट अप आणि इटलीतील संरक्षण कंपन्या यांच्यात परस्पर संवादाला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. या करारामुळे संरक्षण क्षेत्रातील सहकार्य विषयक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
दरम्यान, इटलीचे उपसंरक्षण मंत्री मॅटेओ पेरेगो डी क्रेमानोगो आणि इटलीतील भारताच्या राजदूत नीना मल्होत्रा ​​यांच्यासमवेत पेरुगिया प्रांतातील माँटोनला भेट दिली, जिथे त्यांनी नाईक यशवंत घाडगे आणि दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या इतर भारतीय सैनिकांच्या नुकत्याच बांधलेल्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top