भारत- चीनच्या युद्धनौका एकाच दिवशी कोलंबोमध्ये

कोलंबो – भारताची एक आणि चीनच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेच्या कोलंबो या राजधानीच्या बंदरावर दाखल झाल्या आहेत.या दोन्ही देशांच्या युद्धनौका कोलंबोत तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत.भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस मुंबई पहिल्यांदाच श्रीलंकेत दाखल झाली आहे.

श्रीलंकेच्या नौदलाने आयएनएस मुंबईचे उत्स्फूर्त स्वागत केले.हे फेई,वुझिशान आणि किलियनशान या १४७३ जणांसह दाखल झालेल्या चिनी युद्धनौकांचेही श्रीलंकेच्या नौदलकाकडून स्वागत करण्यात आले.भारताच्या आयएनएस मुंबई युद्धनौकेवर ४१० क्रू मेंबर्स आहेत.भारताने श्रीलंकेला भेट दिलेल्या डॉर्नियर जहाजासाठी आवश्यक सुट्या भागांची खेप आयएनएस मुंबईतून आणण्यात आली आहे. श्रीलंकेसोबत संयुक्त सरावही भारतीय युद्धानौकेकडून करण्यात येईल.चिनी युद्धनौका श्रीलंकेत करतात तरी काय, हे जवळून तपासण्याचीही भारतीय नौदलाला ही संधी असल्याचे मानले जाते.