भाविकांच्या कारला भीषण अपघात ६ जण जागीच ठार, १० जखमी

लखनऊ- देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तरप्रदेशातील बलिया परिसरातील सुघर-छपरा वळणावर आज मंगळवारी पहाटे घडली.

या भीषण अपघातातील मृतांमध्ये राजेंद्र साह (६०) राजू बाह (३५), रणजीत आणि राजकुमार (१०), जस्तन गोड शर्मा (३०) यांचा समावेश आहे.तर १० जखमींपैकी सोनू गुप्ता आणि पंकज गुप्ता याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्तींमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.देवदर्शन करून कारमधून घरी परतताना सर्वजण आनंदात होते.गाणी आणि ट्रिपच्या आठवणीत घरी चालले होते.मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जखमींना वाराणसीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा अपघात इतका भीषण होता की,यामध्ये कार आणि पिकअपचा चक्काचूर झाला. धडकेत कार हवेत उडून रस्त्याच्या कडेला फेकली गेली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top