भिंवडी
भिवंडी तालुक्याच्या काटई गाव परिसरातील भंगाराच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमक दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत संपूर्ण गोदामाला आगीने आपल्या विळख्यात घेतले होते. सर्वत्र परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवताना चांगलीच कसरत करावी लागली. तब्बल तीन तासांनी जवानांना आगी विझवण्यात यश आले. त्यानंतर जवानांना घटनास्थळी कुलिंगचे काम झटपट करुन तेथील सर्व परिस्थितीची पाहणी केली. या आगीत सुदेवाने कोणताही जिवीतहानी झाले नसली तरी संपूर्ण गोदाम जळून खाक झाल्यामुळे मोठी आर्थिक नुकसान झाले आहे.
चेंबूरमध्ये इमारतीला आग
चेंबूर येथील स्वास्तिक चेंबर इमारतींच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना येथील नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. या माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवले.