मुंबई- सोयाबीनला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. सोयाबीन पिकाला ६ हजारांचा हमीभाव मिळाला पाहिजे. सध्या मिळणाऱ्या हमीभावात शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला अनेकवेळा निवेदन देऊनही यावर कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. म्हणून आज संतप्त शेतकऱ्यांनी मंत्रालयाबाहेर सोयाबीन फेकून आंदोलन केले. त्यांनंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.