मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा ‘हनुमान’ भाजपच्या मुख्यमंत्र्यांना टक्कर देणार

भोपाळ – मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कॉंग्रेसने वेगळी खेळी खेळली आहे. कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांविरुद्ध रामानंद सागर यांच्या २००८मध्ये प्रसारित झालेल्या ‘रामायण-२’ मालिकेतील ‘हनुमान ‘ साकारणार्‍या अभिनेता विक्रम मस्ताल यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

‘रामायण’ मालिकेतील हनुमानाची भूमिका केलेले अभिनेते विक्रम मस्ताल यांनी तीन महिन्यापूर्वीच कॉंग्रेसचे माजी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.त्यांना सध्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे.मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने जागांवर फारसा फेरबदल केलेला नाही. विशेषत: दिग्गजांच्या जागा सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ छिंदवाडा येथून लढणार आहेत.
काँग्रेसने बुधनीमधून विक्रम मस्ताल यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात उभे केले आहे. ‘रामायण-२’मध्ये विक्रम मस्तालने हनुमानाची भूमिका साकारली होती. विक्रम मस्तान हा टीव्ही मालिकेतील हनुमानाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. वास्तविक, रामानंद सागर यांनी २००८ मध्ये पुन्हा रामायण मालिकेची निर्मिती केली होती,ज्यामध्ये विक्रम मस्ताल पवनचा मुलगा ‘हनुमान’च्या भूमिकेत दिसला होता.त्यांचे पूर्ण नाव विक्रम मस्ताल शर्मा असून त्यांनी जुलै महिन्यातच सिद्ध सिमरिया धाममध्ये काँग्रेसचे सदस्यत्व घेतले होते.मस्ताल यांनी अनेक प्रसंगी कमलनाथ यांचे कौतुक केले आहे.

हनुमानाचे काम सेवा करणे आहे आणि मलाही जनतेची सेवा करायची आहे, असे राजकारणात येण्याच्या निर्णयावर विक्रम मस्ताल म्हणाले होते. त्याचवेळी नुकतीच कमलनाथ यांनी नर्मदा सेवा सेना संघटनेची स्थापना केली होती. त्यांनी मस्ताल यांना संघटनेचे सहप्रभारी बनवले होते. मस्ताल हे मूळचे मध्य प्रदेशातील बुधनी येथील आहेत.२० वर्षांपासून बुधनी मतदारसंघावर भाजपचा कब्जा आहे
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान १९९०,२००६, २९०८,२०१३ आणि २०१८ मध्ये येथून आमदार झाले. त्याचवेळी २००३ मध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र सिंह येथून आमदार झाले होते.यावेळी काँग्रेसने शिवराज यांच्या विरोधात विक्रम मस्ताल शर्मा यांना तिकीट दिले आहे.मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top