मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी आज मनसेने 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये नाशिक येथील भाजपातून मनसेत दाखल झालेल्या दिनकर पाटील यांचा समावेश आहे. त्यांना नाशिक पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.
आज जाहीर झालेल्या मनसेच्या उमेदवारांमध्ये अमरावती – पप्पू ऊर्फ मंगेश पाटील, वडाळा – स्नेहल जाधव, कुर्ला – प्रदीप वाघमारे, परळी- अभिजीत देशमुख, विक्रमगड – सचिन शिगडा, भिवंडी ग्रामीण – वनिता कथुरे, पालघर – नरेश कोरडा, शहादा – आत्माराम प्रधान, अहमदपूर-चाकूर – डॉ. नरसिंग भिकाणे, गोंदिया – सुरेश चौधरी, ओवळा-माजिवडा – संदीप पाचंगे, पुसद – अश्विन जैस्वाल या उमेदवारांचा समावेश आहे. मनसेच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह 45 जणांचा समावेश होता.
