मनोज जरांगेंच्या सभेसाठी धुळे -सोलापूर महामार्ग बंद

धुळे- मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची १४ ऑक्टोबर (शनिवारी) जालन्याच्या सराटे आंतरवाली येथे जाहीर सभा आहे. ही सभा जवळपास १०० एकर जागेवर होणार आहे. यासाठी शासकीय आकडेवारीनुसार ५ ते ६ लाख मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ अशा तब्बल १२ तासांसाठी धुळे-सोलापूर महामार्ग बंद राहणार आहे. याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आदेश दिले. त्यानुसार या दिवशी पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.
बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्यांसाठी बीड- पाडळसिंगी- मादळमोही- खरवंडी- पाथर्डी- शेवगाव- पैठण- छत्रपती संभाजीनगर किंवा बीड- पाडळसिंगी- खरवंडी- पैठण- छत्रपती संभाजीनगर असा मार्ग असेल. बीडहून जालन्याला जाण्यासाठी बीड- गढी- माजलगाव- आष्टी- घणसांगवी- अंबड- जालना असा पर्यायी मार्ग असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top