मराठा आमदार एकत्र आले तर दोन तासांत आरक्षण मिळू शकेल! मनोज जरांगे पाटलांचे मत

जळगाव – आरक्षणासाठी गोरगरिबांना लढायची वेळ आली.मराठा आमदारांनी पुढाकार घेतला असता तर गोरगरीब कशाला रस्त्यावर उतरला असता. आमचे वाटोळे मराठा आमदारांमुळे झाले असून या आमदारांमुळेच आरक्षणाला काडी लागली आहे. मराठा आमदार एकत्र आले, तर दोन तासात आरक्षण मिळू शकते.खासदार आणि मंत्री जरी एकत्र झाले तरी दोन तासात मराठा आरक्षण मिळू शकते,असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत आहेत.आज ते खानदेश दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील गोरगरिबांचे कल्याण व्हावे; यासाठी आरक्षण असलेलाही व आरक्षण नसलेलाही सर्व मराठा समाज एकत्र आला आहे.खानदेशातील मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आज खानदेशात आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नारायण कुचेंवरही यावेळी त्यांनी टीका केली. त्यांनी माफी मागितली ते ठीक आहे; पण तुम्ही असे वागताच का? नारायण कुचे केवळ मतदारसंघापुरते नाही तर आजच्या आंदोलनात मध्यस्थी असायचे.कुचे यांना आम्ही एवढा मान-सन्मान दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top