कराड- तालुक्यातील मसूर येथील तलाठी व पोस्ट कार्यालये नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीच्या ठिकाणी आहेत. ही कार्यालये मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठेत स्थलांतरित करा, नाहीतर या दोन्ही कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा मसूरच्या ग्रामस्थांनी दिला आहे. याठिकाणी असलेले तलाठी कार्यालय गावाच्या दक्षिणेला आणि पोस्ट कार्यालयसुद्धा जागेचा कार्यकाल संपल्याने पश्चिमेला हलवले आहे. मात्र या दोन्ही जागा ग्रामस्थांसाठी गैरसोयीच्या ठरत आहेत. ही कार्यालये एक किलोमीटर अंतरावर लांब आहेत. तसेच कार्यालयातील सर्व्हर डाऊन होत असल्याने कामकाज बंद पडत आहे. त्यामुळे दोन्ही कार्यालये बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.प्रशासनाने ही मागणी पूर्ण केली नाहीतर या दोन्ही कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.