महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका

महाबळेश्वर

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. ढगाळ वातावरण आणि गार वाऱ्यामुळे महाबळेश्वरमधील प्रमुख बाजारपेठेसह सर्वत्र थंडावा पसरला आहे. काल सायंकाळच्या सुमारास धुके व थंडीचा कडाका अचानक वाढला, तर रात्री घरांवर प्रचंड दव साचले होते.

प्रसिध्द वेण्णा तलाव परिसरातही थंडीचा कडाका वाढला होता. या तलावाच्या पाण्यावर थंडीच्या धुक्याची चादर पसरली होती. नौकाविहारासाठी वापरण्यात येणाऱ्या जेटी दवबिंदूमुळे नाहून निघाल्या होत्या. या गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणाहून पर्यटक महाबळेश्वर, पांचगणी येथे दाखल होत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीलाच थंडी सुरु झाल्याने येत्या महिन्यांमध्ये हवेतील गारवा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top