महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक! राज ठाकरेंनी पुन्हा टोले हाणले

ठाणे – ‘महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो होतो, कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळले नाही.’या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय नेत्यांची खिल्ली उडवली. ते आज डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. कल्याण ते डोंबिवली अशी बाईक रॅली काढत कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले. त्यावेळी राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरेंनी आज डोंबिवलीतील फडके रोडवरील मनसेच्या मध्यवर्ती शाखेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू पाटील, अविनाश जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरेंनी डोंबिवलीचे आराध्य दैवत श्री गणेशाचे दर्शन गणपती मंदिरात जाऊन घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या हस्ते आज शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मराठी शाळा वाचवा अशी साद घातली. त्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवद साधला. ते म्हणाले की, लोकसभेासाठी मनसे राज्यातील महायुतीसोबत जाणार या फक्त चर्चा आहेत, त्याला कोणतेच तथ्य नाही. व्यासपीठावर दिसण्याने आघाडी घडत किंवा ठरत नसतात. महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो होतो, कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच केळले नाही. सध्या जे वातावरण आहे हे आधीच कधी पाहिले नव्हते. लोकांनी यांना वठणीवर आणले पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर करत आहोत असेच वाटणार. आमच्या शाखा अध्यक्षांपर्यंत बैठक झाल्या आहेत. ठाणे कल्याण भिवंडी या ठिकाणी बैठका झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू आहे. सर्व ठिकाणी चिखल झाला आहे. लोकांनी नेत्यांना धडा शिकवला पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत मी बोललो होतो. मी आधी बोलतो नंतर तुम्हाला ते पटते.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ‘अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात मात्र त्यांच्या समोरच राजकारण सुरू आहे ते पाहून तरुण वर्ग राजकारण येणार नाही. या गोष्टीचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे. राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवत आहे. सध्या महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण पुढे केले जाते. निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतो? निवडणुकीसाठी यंत्रणा उभी का करु शकत नाही? शिक्षकांना इलेक्शन ड्युटी देऊन बघा. निवडणूक आयोग शिक्षकांवर कोणती कारवाई करतात ते बघतो.’

शरद पवार आज रायगडावर गेले होते. याबाबत राज ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्रातले महापुरुष जातींमध्ये विभागून टाकलेत. आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top