महावितरण, टाटा पॉवरची वीज महागली!

मुंबई

महावितरण, टाटा पॉवरची वीज १ एप्रिलपासून महागल्याने आता वीज ग्राहकांना वीजेसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. टाटा पॉवरने वीजेच्या दरात ४४ ते ५९ टक्क्यांनी तर महावितरणने वीज दरात ५.७ टक्क्यांनी वाढ केली. दरम्यान, टाटा पॉवरने मुंबई उपनगरातील ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. निवासी ग्राहकांना १०० युनिटपर्यंत १.९९ रुपये अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.,तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत ग्राहकांना प्रति युनिट २.६९ रुपये, ३०१ ते ५०० युनिटपर्यंत ग्राहकांना प्रति युनिट ५.३३ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ५.६७ रुपये मोजावे लागणार आहेत. महावितरणने १०० युनिटपर्यंत ३० पैसे, १०१ ते ३०० युनिटपर्यंत ६५ पैसे, ३०१ ते ५०० युनिटपर्यंत ९४ पैसे तर ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्यांना १.०७ रुपये मोजावे लागतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top