माजी आमदार पांडुरंग बरोरा आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

शहापूर

शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली असून उद्या ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. मात्र, या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. बरोरा हे आधी राष्ट्रवादीचे आमदार होते. परंतु २०१९ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधले. त्यानंतर राष्ट्रवादीने शहापूर मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या दरोडा यांना उमेदवारी दिली. दौलत दरोडा यांनी बरोरा यांचा पराभव केला. आता दरोडा हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेल्याने बरोरा यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.

उद्या सायंकाळी ५ वाजता बरोरा हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडेल. दरम्यान, बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे ४ वेळा शहापूर विधानसभेवर निवडून आले होते. शहापूर तालुक्यात त्यांनी विकास कामे केली. त्यामुळे शहापूर परिसरात त्यांचा दबदबा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top