माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मालेगाव –

मालेगावचे माजी आमदार रशीद शेख यांचे काल रात्री ११ च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.

मालेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले. त्यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार आणि राज्य महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. १९९९ मध्ये विधानसभा निवडणूकीत शेख यांनी मिळवलेला विजय चर्चेत आला होता. २५ वर्षांपासून आमदार असलेल्या निहाल अहमद यांचा शेख यांनी पराभव केला होता. दरम्यान, आज मालेगाव येथील आयेशानगर कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. शेख यांच्या निधनानंतर त्यांना नाशिक आणि मालेगाव मधील सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top