माजी मिस वर्ल्ड स्पर्धकाचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन

उरुग्वे

माजी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक शेरिका डी अरमासचे १३ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ती अवघ्या २६ वर्षांची होती. ती कर्करोगाशी लढा देत होती. तिच्यावर किमोथेरपी आणि रेडियोथेरपीसुद्धा करण्यात आली होती. शेरिकाच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

शेरिकाने २०१५ मध्ये ‘मिस वर्ल्ड’ या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत दक्षिण अमेरिकन देश असलेल्या उरुग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. यात ती टॉप ३० स्पर्धकांमध्ये पोहोचू शकली नव्हती. शेरिकाचा भाऊ मयक डी अरमासने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकली आहे. यात ‘नेहमी उंच भरारी घे, असे त्याने लिहिले आहे. ‘मिस युनिव्हर्स उरुग्वे २०२२’ कार्ला रोमेरोने म्हटले की, ‘या जगासाठी ती फारच वेगळी व्यक्ती होती. मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत जितक्या महिलांना भेटले, त्यापैकी ती सर्वांत सुंदर होती’, मिस उरुग्वे २०२१’ लोला डे लॉस सेंटॉसने देखील शेरिकाला श्रद्धांजली वाहिली. ‘मला तुझी खूप आठवण येईल. केवळ तू मला दिलेल्या पाठिंब्यासाठीच नाही तर तुझे प्रेम, तुझा आनंद आणि कायम माझी साथ दिल्याबद्दल मला तुझी आठवण येईल,’ असे ती म्हणाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top