माथेरानच्या डोंगरावरील ठाकूरवाडीत पाणीटंचाई

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात माथेरानच्या डोंगरावर वसलेल्या आषाणे ठाकूरवाडीत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या वाडीला जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या या वाडीत खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
आषाणे ठाकूरवाडीसह १२ आदिवासी वाड्या या माथेरानच्या डोंगरावर वसल्या आहेत.यातील आषाणे ठाकूरवाडीची लोकसंख्या जेमतेम ६०० इतकी आहे. या गावात दोन विहिरी आहेत. पण दोन्ही विहिरी आटल्या आहेत.
माथेरानच्या डोंगरावरील या सर्व १२ वाड्यांसाठी उमरोली ही ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ठाकूरवाडीच्या लोकांनी पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, याठिकाणी पाणीटंचाई सुरू होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top