मानवी तस्करीचा आरोपावरून अमेरिकेत भारतीयाला अटक

न्यूयॉर्क- अमेरिकन अधिकाऱ्यांनी हर्ष कुमार रमणलाल पटेल नावाच्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर मानवी तस्करीसह खुनाचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी हर्ष कुमारने गुजरातमधील एका संपूर्ण कुटुंबाला व्हिसाशिवाय अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हिमवादळामुळे सर्वांचा मृत्यू झाला. त्याला उद्या २८ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

डर्टी हॅरी, परम सिंग आणि हरेश रमेशलाल पटेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्ष कुमार पटेल याला गेल्या आठवड्यात शिकागो विमानतळावर अटक करण्यात आली होती. फ्लोरिडा येथील रहिवासी असलेल्या स्टीव्ह शँड या तस्कराला अमेरिकेत प्रवेश करण्यास मदत केल्याचाही हर्षकुमार पटेलवर आरोप आहे.पोलिसांच्या अहवालानुसार, हर्ष पटेलचा संघटित मानवी तस्करी करणार्या टोळीचा सहभाग . या टोळीने भारतीय नागरिकांना अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश दिला.जगदीश पटेल (३९),पत्नी वैशाली (३७), मुलगी विहांगी (११) आणि मुलगा धार्मिक (३) यांच्या मृत्यूने कॅनडा आणि अमेरिकेतील गुजराती समुदाय हादरला होता.

हे कुटुंब गांधीनगर जवळील डिंगुचा येथील होते.हे सर्व मृतदेह गुजरातमधील रहिवासी कुटुंबाचे आहेत. ते सर्व १९ जानेवारी २०२२ रोजी इमर्सन,मॅनिटोबाजवळ बर्फात गोठलेल्या स्थितीत आढळले. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी हर्ष पटेलचा सहकारी असलेल्या स्टीव्ह शेंड नावाच्या व्यक्तीला अटक केली होती.संपूर्ण प्रकरण उघडकीस येताच मुख्य आरोपी हर्ष पटेललाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह सापडल्यानंतर सीमेच्या कॅनडाच्या बाजूने एकही सोडलेले वाहन सापडले नाही, ज्यावरून हे स्पष्ट होते की कोणीतरी संपूर्ण पटेल कुटुंबाला सीमेवर सोडून परत गेले होते. पोलीस चालक व वाहनाचाही शोध घेत होते, मात्र चालक अद्याप सापडलेला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top