Home / News / मायावतींची आज पुण्यात सभा

मायावतींची आज पुण्यात सभा

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या उद्या रविवारी बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभेला संबोधित करतील. येरवडा परिसरात प्रादेशिक मनोरुग्णालय...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या उद्या रविवारी बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभेला संबोधित करतील. येरवडा परिसरात प्रादेशिक मनोरुग्णालय मैदान, ई कॉमर झोन येथे दुपारी १२ वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

सभेत मायावती यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय आकाश आनंद, राज्यसभा खासदार आणि केंद्रीय समन्वयक गौतम, केंद्रीय समन्वयक, महाराष्ट्र प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.सुनील डोंगरे प्रामुख्याने उपस्थित राहतील. प्रदेश महासचिव काळुराम चौधरी प्रदेश सचिव सुदीप गायकवाड व पुणे जिल्हा प्रभारी मोहम्मद शफी देखील सभेत उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे यांनी दिली. पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते या सभेत लाखोंच्या संख्येत उपस्थित राहतील, अशी माहिती बसपा पदाधिकार्यांनी दिली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या