Home / News / मालमत्ता कर भरला नाही! सरपंचांसह २ सदस्य अपात्र

मालमत्ता कर भरला नाही! सरपंचांसह २ सदस्य अपात्र

पुणे- मालकीच्या देय मालमत्तेच्या कराचा भरणा मुदतीत जमा न केल्याने गावातील महिला सरपंचांसह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याची घटना मावळ...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे- मालकीच्या देय मालमत्तेच्या कराचा भरणा मुदतीत जमा न केल्याने गावातील महिला सरपंचांसह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याची घटना मावळ तालुक्यात घडली आहे.

मावळ तालुक्यातील परंदवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका दत्तात्रय पापळ, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिवराम पापळ आणि दामू गणपत ठाकर अशी अपात्र ठरविलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता व्दिवेदी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या यासंदर्भातील आदेशाला आव्हान देत परंदवडीचे रहिवासी चंद्रकांत भोते आणि भरत भोते यांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते. त्याची अंतिम सुनावणी पाच ऑगस्ट रोजी झाल्यानंतर गेल्या मंगळवारी अपात्रतेचे आदेश सर्व संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या