मालाड मेट्रो स्थानक आता ‘ओसवाल मालाड मेट्रो’ स्थानक

मुंबई- मुंबई मेट्रो २ अ मार्गावरील मालाड स्थानकाचे नाव बदलून मोतीलाल ओसवाल मालाड मेट्रो स्थानक असे करण्यात आले आहे. सार्वजनिक- खासगी भागीदारीच्या
माध्यमातून या स्थानकाला हे नाव देण्यात आले आहे.
हे नाव देण्याच्या बदल्यात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीकडून मेट्रो स्थानकावर विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तर कंपनीला मालाड पश्चिम मेट्रो स्थानकाचे स्टेशन ब्रँडिंग हक्क मिळणार आहेत. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोतीलाल ओसवाल यांनी मालाड मेट्रो स्टेशनसाठी स्टेशन ब्रँडिंग अधिकारांचे अधिग्रहण हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top