मालेगाव – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरातील संतप्त नागरिकांनी मालेगाव कुसुंबा मार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केली. टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे ही घटना घडली, असे सांगितले जात आहे.
हातात लाठ्या काठ्या घेतलेल्या स्थानिकांच्या जमावाने टोलनाक्यावरील संगणक, कॅमेरे यांच्यासह सर्व साहित्याची तोडफोड केली. या वेळी स्थानिकांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. हा प्रकार काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. या ठिकाणी स्थानिक व टोल कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच बाचाबाची होत असते.