मुंबईत अदानीची वीज दरवाढ रद्द करण्याची कॉंग्रेसची मागणी

मुंबई- राज्यात उन्हाचा पारा चांगलाच तापला आहे. मुंबईकरांनाही उन्हाच्या तडाख्याला तोंड द्यावे लागत आहे.अशातच अदानी कंपनीने मुंबईतील ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिला आहे.१ मे पासून ही वीज दरवाढ प्रत्यक्ष लागू होणार आहे. मुंबई कॉंग्रेसने या दरवाढीला विरोध करत दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाच्या विभागीय झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी ही वीज दरवाढ तत्काळ रद्द करावी अशी मागणी केली आहे.

सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे की,१ मे पासून मुंबईत वीज दरवाढ लागु होत असून ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना ‘ या म्हणीप्रमाणे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.उन्हात होरपळणार्‍या मुंबईकरांना अदानीच्या दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत.त्यामुळे अदानी कंपनीने ही वीज दरवाढ रद्द करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top