मुंबईसाठी मुबलक पाणीसाठा पाणी कपातीची शक्यता नाही

मुंबई – यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा ९२.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना २८० दिवस पुरेल एवढा आहे. त्यामुळे पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत मुंबईत पाणी कपात करण्याची वेळ येणार नाही.मुंबई महानगर पालिकेच्या पाणी खात्यातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.जलाशयातील पाण्याचा एक टक्का हा मुंबईला तीन दिवस पुरणारा असतो.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा पाहत तो सुमारे २७८ ते २८० दिवस किंवा साधारणपणे ९ महिने पुरणारा आहे. जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांवर गेला की मुंबईची पाणी चिंता मिटते.आता तर पाणी साठा ९० टक्क्यांच्या वर गेला आहे.त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीकपातीची शक्यता नाही,असे या अधिकाऱ्याने सांगितले.