मुंबई-पालिका प्रशासनाने मुंबई शहरातील सिमेंट काँक्रीटच्या दुसऱ्या टप्यातील कामासाठी ६ हजार ३७३ कोटींच्या निविदा मागविल्या आहेत. परंतु या कामात उपकंत्राट व प्रभागनिहाय कंत्राट द्यावे, अशी कंत्राटदारांची मागणी पालिका प्रशासनाने फेटाळली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.त्यामुळे या आदेशाचे पालन करत
पालिकेने तातडीने निविदा प्रक्रिया राबवत पहिल्या टप्यात ६ हजार कोटींचे कंत्राट दिले.मात्र हे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होण्याआधीच दुसऱ्या टप्यातील ४०० किमी अंतराचे २०० हून अधिक रस्ते कामासाठी निविदा मागविली आहे.हे दुसऱ्या टप्यातील कामांत उपकंत्राट व प्रभागनिहाय कंत्राट देण्यात यावे अशी मागणी या कंत्राटदारांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र उप कंत्राटदारांची ही मागणी पालिका प्रशासनाने फेटाळली.